सुहास शिरवळकरांच्या 'समांतर' कादंबरीवर वेब सिरीज येतेय अस वाचलं आणि पुस्तक घेऊन आले.
सु.शि. च्या इतर कादंबर्यां सारखीच 'समांतर' पण थरारक, उत्कंटावरधक , वेगवान आहे.
सतत येणारी वळणे, सुरेख व्यक्ती चित्रण यांनी रंगलेल्या या २०० पानी कांदबरीचा शेवट जरासा abrupt असला तरीही कथा नक्कीच page turner आहे.
पुस्तक २ दिवसात संपलं आणि मग सिरीज पाहीली.
थरारक घटनांनी फुलवलेली आणि अनपेक्षित वळणांनी जोडलेली अशी कथा सिरीज साठी अगदी योग्य होती
त्यात दुनियादारीचीच टीम.
पण कादंबरीच्या तुलनेत मालिका जाम फसलीय
स्वप्निल जोशी ला ‘कुमार महाजन’ सापडलाच नाहीये. त्याचे सततचे अचंबित expressions २-३ भागांनंतर कंटाळवाणे व्हायला लागतात.
खर तर कादंबरीमधे एक एक प्रसंग इतका खुलवलाय की पुन्हा पटकथा लिहायची गरजच नव्हती.
पण नको त्या क्षणांवर अती focus, over dramatisation आणी मेलोड्रामा ने पुर्ण मालिकेचा बाज बिघडवून टाकलाय .
पन्हाळ्याच्या खाणावळीतल्या माणसाची भेट , सुदर्शन ला खोक कशी पडली - ही काही उदाहरणं जे प्रसंग उगाच ताणले आहेत .
त्या उलट कुमार आणि सुदर्शन ची भेट - जी घटना milestone आहे ती अगदीच गुंडाळून टाकलीय .
पन्हाळ्याच्या खाणावळीतल्या माणसाची भेट , सुदर्शन ला खोक कशी पडली - ही काही उदाहरणं जे प्रसंग उगाच ताणले आहेत .
त्या उलट कुमार आणि सुदर्शन ची भेट - जी घटना milestone आहे ती अगदीच गुंडाळून टाकलीय .
सिजन १ चा शेवट मात्र perfect twist वर झालाय
पुस्तक आधी वाचलं नसतं तर कदाचित मी मालिका enjoy केली असती.
पाहुया आता पुढचा सिजन कसा असणार आहे ते
#samantar #mxplayer #marathi