Saturday, January 13, 2018

गुण गाईन आवडी - पु.ल. देशपांडे

गुण गाईन आवडी

गेल्या आठवड्यात लायब्ररी मधे हे पुस्तक नजरेस पडलं .
लेखकाचे नाव 'पु.ल. देशपांडे '. मागच्या पानावर पुलंचा फोटो होता पान भरून .
म्हटलं अरे कधिच कसं नाही वाचनात आलं आधी ?

पुस्तक घेऊन आले आणि वाचायला लागले .
एकूण १५ लेखांचा संग्रह .
१-१ लेख वाचता वाचता लक्षात आलं कि हे पु.ल. तर वेगळे वाटतायंत
काही अपवादात्मक सोडून बहुतांशी त्यांची मी वाचलेली पुस्तकं हि विनोदी  धाटाची , पण हे लेख एकदम वेगळ्या शैलीत लिहिलेत .

'गणगोत'  सारखच ह्यातही व्यक्ती -चित्रण आहेत. पण ह्या १५ लेखांमध्ये रेखाटलेल्या व्यक्तिरेखा ह्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवर महोदयांच्या आहेत . सर्व लेख हे साधारण १९६० ते १९७४ ह्या काळात लिहिलेले आहेत .

काही नाव सोडून, जसे 'बाबा आमटे ', रा.ग. गडकरी , बाकीच्या व्यक्तींबद्दल फक्त नावच ऐकलं होत .
जसजसं वाचत गेले तसतसं जाणवलं ते पुलंची ह्या सर्वांवरची भक्ती , निःस्वार्थ प्रेम आणि आपुलकी . त्यांची बारीक अवलोकन शक्ती  आणि उपजत रसिकता .

प्रत्येक लेखात वाक्यागणिक नवे नवे पैलू उलगडत गेले , आणि जणू काही एक एक चित्र  समोर रेखाटलं जातंय असं वाटलं .

एक एक व्यक्तीचित्र उलगडत गेलं आणि मनात  आलं  की कित्येक गोष्टी आवर्जून अनुभवायला पाहिजेत .

केशवराव दाते , भास्करबुवा बखले, मल्लिकार्जुन मन्सूर, पंडीत वसंतराव  , कुमार ह्यांची गायकी कधी ऐकलीच नाही आपण ह्याची खंत वाटू लागली.  गडकऱ्यांचं राजसंन्यास , भावबंधन आणि बा.भ.बोरकर नव्याने  वाचावेसे वाटलं .

माझ्यासाठी तर पुलं च ग्रेट , पण पुलं ना  जे GREAT वाटतात त्या व्यक्ती कश्या होत्या हे नक्कीच वाचनीय आहे

ज्या विनम्र आणि आदर पूर्वक शैलीत हे लेख लिहिलेत ते वाचून पुलंबद्दलचा आदर अजूनच दुणावला  आणि पुलंच्या लिखाणाचा हा एक वेगळाच पैलू वाचायला मिळाला .

कधी हाती आलं हे पुस्तक तर अगदी आवर्जून वाचाव अस आहे . 

No comments:

Post a Comment