आम्ही मुंबईकर कारण -
* 'अ ' ठिकाणाहून 'ब' ठिकाणाचं अंतर किती आहे हे आम्ही मिनिटं -तासात मोजतो , किलो मीटर मध्ये नाही
* ५-१७, ८-४२, ७-२४ ह्या वेळा कशाच्या आहेत हे कळायला आम्हाला अजून काही स्पष्टीकरणाची गरज नाही
* वडा - पाव ही आमची अत्यंत आवडती डीश आहे आणि तो नाश्ता , दुपारचं जेवण किंवा 'असच काहीतरी ' ह्या सर्व कारणांसाठी खाऊ शकतो
* संकट काळी आम्हाला सिद्धी विनायक , हाजी अली आणि माउंट मेरी ची एकत्र आठवण येते
* मुंबई च्या वरचे सगळे ;नॉर्थ इंडियन ' आणि खालचे सर्व 'मद्रासी ' हे आमचं अर्वाचीन मत आहे
* जगातली सर्वात शांत, आत्म परीक्षण करायची जागा म्हणजे मरीन ड्राईव्ह चा गजबजलेला कट्टा
* मुंबई च्या स्वतःच्या अशा खास भाषेत - ज्यात बॉस , घंटा , निकल ले , जुगाड, मांडवली असे विविध अद्वितीय शब्द आहेत - आम्ही पारंगत आहोत
* आयुष्यातील नकार पचवायची दैवी शक्ती आणि मनोबल वृद्धिंगत करण्यात इथल्या रिक्षा वाल्यांचा मोठा हातभार आहे
* जगात कुठेही असो , 'गणपती बाप्पा ' ची आरोळी कानावर पडली की लगेच 'मोरया ' असा जयघोष मनात उठतोच
* एकदा तरी 'ताज ' मध्ये जेवायला नाही तर किमान चहा प्यायला तरी जायचं हे आमचं बालपणाचं स्वप्न असतंच
No comments:
Post a Comment